सकाळ वृत्तसेवा
Thursday, June 17, 2010
पुणे - केंद्र सरकारने यंदापासून मुलांसाठी लागू केलेल्या मोफत व सक्तीचे शिक्षण कायद्यासंदर्भात सर्व लोकप्रतिनिधींना प्रशिक्षण देण्याचा निर्णय गुरुवारी जिल्हा परिषदेने घेतला आहे. यानुसार सर्व लोकप्रतिनिधींसाठी येत्या शनिवारी खास कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा परिषद जिल्ह्यातील खासदार, आमदारांसह सर्व लोकप्रतिनिधींना मुलांच्या शिक्षण हक्कासंदर्भात धडे देणार आहे. पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत ही कार्यशाळा होणार आहे. त्यामुळे आतापर्यंत जिल्हास्तरावर आयोजित केल्या जाणाऱ्या अनेक बैठका, सभा आणि कार्यक्रमांना दांडी मारणाऱ्या लोकप्रतिनिधींना या कार्यशाळेला दांडी मारता येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. पुण्यातील विधानभवनात येत्या शनिवारी (ता. 19) सायंकाळी चार वाजता ही कार्यशाळा होणार आहे. या कार्यशाळेत माजी शिक्षण संचालक वसंत काळपांडे सर्व लोकप्रतिनिधींना मोफत व सक्तीच्या शिक्षण कायद्यासंदर्भात प्रशिक्षण देणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेतील विश्वसनीय सूत्रांकडून देण्यात आली. या कार्यशाळेत खासदार, आमदारांसह पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेचे महापौर, दोन्ही महापालिकांच्या शिक्षण मंडळांचे सभापती, जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व विषय समित्यांचे व पंचायत समित्यांचे सभापती, सर्व नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्य आदींना निमंत्रित करण्यात आले आहे. | |||||
शनिवार, २९ डिसेंबर, २०१२
शिक्षण हक्क कायद्याबाबत लोकप्रतिनिधींची कार्यशाळा
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा