- सकाळ वृत्तसेवा
Monday, April 16, 2012
पुणे -
""शिक्षणाबाबत मोकळे, उदारमतवादी धोरण असणे गरजेचे आहे. त्यासाठी शिक्षकांनी लेखन
करताना व्यवस्थेकडे त्रयस्थ नजरेने पाहायला हवे. तसेच ज्वलंत विषयांवर लिहिताना
भावनिक होण्यापेक्षा समाजातील वास्तव पुढे आणले पाहिजे. त्यासाठी ते समजून घेणे
गरजेचे आहे, असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. वसंत आबाजी
डहाके यांनी व्यक्त केले.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे पहिल्या राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या संमेलनाच्या समारोप सत्रात प्रा. डहाके प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. याप्रसंगी माजी शिक्षक सहसंचालक आणि लेखक भाऊ गावंडे, चव्हाण प्रतिष्ठानचे दत्ता बाळसराफ, डॉ. वसंत काळपांडे, मनीषा पाटील उपस्थित होते. काही शिक्षकांनी लिहिलेल्या पुस्तकांचे प्रकाशन प्रा. डहाके यांच्या हस्ते या वेळी करण्यात आले. प्रा. डहाके म्हणाले, ""मराठी साहित्याचा विचार करताना, शिक्षक या घटकास आपण बाजूला ठेवू शकत नाही. शिक्षकांनी आजपर्यंत अनेक प्रकारचे लेखन केले आहे. मात्र राज्यशास्त्र, मानसशास्त्र, अर्थशास्त्र या विषयांवर शिक्षकांनी मौलिक असे लेखन अजून केलेले दिसत नाही. शिक्षकांना अनेक विषयांमध्ये पारंगत असावं लागत. शिक्षक स्वतः समृद्ध होता असतो व विद्यार्थ्यांनादेखील समृद्ध करत असतो. या संमेलनामुळे शिक्षकांची सर्जनशीलता जागृत झाली असून, काही तरी वेगळे करायची इच्छा त्यांच्यात निर्माण झाली आहे.'' मनीषा पाटील म्हणाल्या, ""शिक्षकांमध्ये वैचारिक आदानप्रदान व्हावे, हा या संमेलनाचा हेतू आहे. खरया अर्थाने पूर्ण महाराष्ट्राचे ह्या संमेलनात प्रतिनिधित्व झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. काळपांडे यांनी केले, तर दत्ता बाळसराफ यांनी आभार मानले. दरम्यान दिवसभरात "वाचन, लेखन व अभिव्यक्तीची आवड निर्माण करणारे उपक्रम' या विषयांवर निवडक शिक्षकांनी आपले विचार मांडले. तसेच "मानवी जीवनमूल्य रुजविण्यासाठी पाठ्यपुस्तके' या विषयावर चर्चा झाली. |
|||
शुक्रवार, २८ डिसेंबर, २०१२
'समाजातील वास्तव शिक्षकांनी पुढे आणावे'
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा