सकाळ वृत्तसेवा
Sunday, November 04, 2012
मुंबई - "मुलं
ही देवाघरची फुलं' असली तरी त्यांच्यावर बालवयात संस्कार होणे फार महत्त्वाचे आहे.
हे संस्कार घरात पालक आणि बाहेर शिक्षक रुजवायचे काम करतात. पालकांनी आणि
शिक्षकांनी मुलांना मारझोड, शिक्षा न करताही संस्कार स्वीकारायला हवेत. यासाठी या
मुलांच्या वर्तनाचे निरीक्षण करण्याची गरज लक्षात घेत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानने
"राष्ट्रीय शिक्षण दिना'चे औचित्य साधून "शालेय विद्यार्थ्यांसाठी वर्तनसंहिता' या
विषयावर एक दिवसाच्या राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन केले आहे.
या परिषदेला "राष्ट्रवादी'च्या खासदार सुप्रिया सुळे यांची उपस्थिती उल्लेखनीय आहे. डॉ. वसंत काळपांडे प्रास्ताविक करणार आहेत. या वेळी "शिक्षणव्रती डॉ. कुमुद बन्सल' या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे.
2009 मधील शिक्षण हक्क कायद्यात शारीरिक शिक्षेला पूर्णपणे मज्जाव केला आहे. शाळेतील विद्यार्थ्यांना भीती, मानसिक आघात आदी बाबींना निर्बंध आहे. असे असले तरीही विद्यार्थ्यांच्या शाळेतील वर्तनाचे निकष कसे असावेत, ते त्या शाळांच्या माहितीपत्रकात दिलेले असते. मात्र, राज्यस्तरावर सर्वमान्य असे निकष तयार झाले नाहीत; तसेच शाळांनी ठरवून दिलेले लिखित किंवा अलिखित निकष विद्यार्थी पाळत नसतील तर काय करायचे, याबाबत शिक्षक संभ्रमात असल्याचे दिसून येते. शालेय विद्यार्थ्यांची आदर्श अशी वर्तनसंहिता का असावी, तिच्यात कोणत्या बाबींचा समावेश करणे योग्य ठरेल, विद्यार्थ्यांकडून त्याचे पालन झाले नाही; तर कोणत्या स्तरावर कार्यवाही करायची, या संदर्भात शिफारशी करण्याचा या परिषदेचा हेतू आहे. या परिषदेत शैलजा मुळे, डॉ. समीर दलवाई, डॉ. आशिष देशपांडे, सूर्यकांत कुलकर्णी, प्रा. मानसी वैशंपायन आदी तज्ज्ञ सहभागी होणार आहेत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा