- सकाळ न्यूज नेटवर्क, ६ सप्टेंबर २०१२
मुंबई - माजी
सनदी अधिकारी आणि शिक्षणतज्ज्ञ डॉ. कुमुद बन्सल (वय 66) यांचे मेंदूमध्ये
रक्तस्राव झाल्याने आज निधन झाले. त्यांच्या पश्चात माजी सनदी अधिकारी विनय बन्सल
आणि मुलगा, मुलगी, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. कुमुद बन्सल यांच्यावर
चंदनवाडी स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी आजी-माजी सनदी अधिकारी
मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामविकासमंत्री जयंत पाटील व उच्च
तंत्रशिक्षणमंत्री राजेश टोपे यांनीही अंत्यदर्शन घेतले.
1969 च्या तुकडीतील प्रशासकीय अधिकारी असलेल्या डॉ. बन्सल यांनी त्यांच्या सेवाकाळातील 37 वर्षांपैकी तब्बल 22 वर्षे केवळ शिक्षण विभागात काम केले. त्यापैकी 14 वर्षे त्या राज्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या प्रधान सचिव होत्या, तर आठ वर्षे केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयांतर्गत शिक्षण विभागाच्या प्रधान सचिव होत्या. राज्यातील आतापर्यंतच्या सर्वाधिक कार्यक्षम शिक्षण सचिव म्हणून त्यांचा आदराने उल्लेख केला जातो. त्यांच्या कार्यकाळात राज्यात सुरू झालेल्या अनेक धोरणांचा नंतर केंद्र सरकारनेही स्वीकार केला. 1991 मध्ये त्यांनी सर्वप्रथम ग्रामशिक्षण समित्या निर्माण केल्या. त्यानंतर 1992 मध्ये केंद्रप्रमुख हे महत्त्वाचे पद निर्माण केले. तळागाळात दर्जेदार शिक्षण पोचविण्यामध्ये या दोन्ही निर्णयांमुळे मोठी मदत झाली. पुढे केंद्र सरकारनेदेखील राज्याच्या पावलावर पाऊल ठेवून प्रशासनाचे विकेंद्रीकरण, ग्रामशिक्षण समित्या सर्व देशभर राबविल्या.
शिक्षण हक्क कायद्याचा मसुदा बनविण्यामध्येही त्यांचे महत्त्वाचे योगदान होते. दोन वर्षांपूर्वी राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने त्यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षण शुल्क निर्धारण समिती नेमली होती.
राज्याच्या शैक्षणिक धोरणाची दिशा आणि प्रौढ साक्षरता अभियान यशस्वी राबविण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता. त्यांना 2001 मध्ये राज्य सरकारने साक्षरतेसाठी केलेल्या कामासाठी "राज्य साक्षरता पुरस्कार' देउन गौरविले होते. त्यांच्याच कारकिर्दीमध्ये अनेक जिल्हे साक्षर झाले. राज्याच्या शिक्षण विभागामध्ये प्रथमच प्रशासनाच्या विकेंद्रीकरणाचा प्रयोग त्यांनी राबविला.
मूळच्या पंजाबी भाषक असलेल्या डॉ. बन्सल यांची महाराष्ट्राशी सरकारी सेवेपलीकडे जाऊन नाते जुळले होते. कारकिर्दीच्या सुरवातीपासून कटाक्षाने मराठीतूनच संभाषण करण्याकडे त्यांचा कल असायचा. मराठी साहित्यावरदेखील त्यांनी प्रेम केले. मराठी ऐतिहासिक कादंबऱ्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय होता. निवृत्तीनंतर त्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या शिक्षण विकास मंचमध्ये कार्यरत होत्या.
खासदार सुप्रिया सुळे (निमंत्रक, शिक्षण विकास मंच) - डॉ. बन्सल हे महाराष्ट्राच्या आणि देशाच्या शिक्षण क्षेत्रात एक आदरणीय व्यक्तिमत्त्व होते. राज्याच्या आणि देशाच्या शैक्षणिक धोरणाला दिशा देण्याचे महत्त्वाचे कार्य त्यांनी केले. शिक्षण हीच त्यांनी खरी आवड होती. शिक्षण विकास मंच आणि पवार पब्लिक ट्रस्ट या ठिकाणी त्यांनी आम्हाला मोलाचे मार्गदर्शन केले. सेवानिवृत्तीनंतरही निरपेक्ष वृत्तीने आणि निष्ठेने तेच कार्य सुरू ठेवणारे अधिकारी अत्यंत दुर्मिळ असतात. त्यांच्या मार्गदर्शनाला इतक्या लवकर आम्हाला मुकावे लागेल, असे चुकूनही वाटले नव्हते.
वसंत काळपांडे (माजी अध्यक्ष, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ) - डॉ. बन्सल यांच्यासोबत 25 वर्षांपेक्षाही अधिक काळ काम करण्याची संधी मला मिळाली. त्या महाराष्ट्रीय नसतानाही मराठी भाषेवर त्यांनी प्रेम केले. महाराष्ट्रातील शैक्षणिक विकासामध्ये त्यांचे मोठे योगदान आहे.
ज. मो. अभ्यंकर (माजी नियंत्रक, शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रम) - शिक्षण विभागात अधिकारी म्हणून काम करीत असताना मला डॉ. बन्सल यांच्यासोबत काम करता आले. शिक्षणविषयक त्यांना तळमळ होती. त्यांच्याकडे दूरदृष्टी होती, त्यामुळेच त्यांनी त्या वेळी बनविलेली धोरणे राज्याच्या व देशाच्या शिक्षण क्षेत्राला दिशा देणारी ठरली.
बसंती रॉय (माजी सचिव, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, मुंबई विभाग) - डॉ. बन्सल यांचा कार्यकाळ हा महाराष्ट्राचा शैक्षणिक क्षेत्रातील सुवर्णकाळ होता. त्यांच्या कार्यकाळात अनेक महत्त्वाची शैक्षणिक धोरणे अमलात आली. त्यांची कार्यशैली प्रभावी होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करताना आम्हाला खूप शिकायला मिळाले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा